आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहर हर महादेव या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहासिक प्रसंग दाखवले आहेत. त्यामुळे इतिहासाची विकृतीकरण होत आहे. शिवाजी महाराजांसोबत लढणाऱ्या बांदल सरदारांचे वंशज, आदी वंशजांचा इतिहासाचे मोडतोड करून करणारा खोटा इतिहास दाखवणारा हा चित्रपट बंद ठेवण्यात यावा. सिनेमागृह लॅबिलिटीचा गैरफायदा घेत हर हर महादेव या चित्रपटात दाखवत आहे. चित्रपटगृहचालकांनी हा चित्रपट दाखवू नये असे आवाहन मराठा क्रांति मोर्चातर्फे आज करण्यात आले.
अन्यथा टोकाचे पाऊल उचलू
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला मराठी साम्राज्य म्हटले गेले. चुकीचा इतिहासामुळे भावना दुखावल्या गेले आहेत. त्यामुळे चित्रपट गृहांनी हा चित्रपट अजिबात दाखवू नाही. अन्यथा संतप्त तरूण टोकाचे पाऊल उचलतील. त्याला चित्रपट चालक जबाबदार राहातील. असा इशा-याचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
शिवरायांना अभिवादन
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी सकाळी दहा वाजता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्रूट पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय असं जे घोष करून शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.
शिवप्रताप दिनाचे महत्व
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी अठरापगड मावळ्यांना सोबत घेऊन जुलमी आदिलशाही निजामशाही आधी विरोधात बंड पुकारले होते त्यांच्या ताब्यातील किल्ले जिंकण्यास सुरुवात केली होती. शिवरायांना रोखण्यासाठी बलाढ्य सरदार अफजल खानाने विडा उचलला होता. स्वराज्यावर वाकड नजर ठेवून आलेल्या अफजलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड येथे मोठ्या चातुर्याने वध केला होता. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
या वर्षी 363 वा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुनील कोटकर, रेखा वाहाटुळे, सचिन मिसाळ, विजय काकडे, अमोल सोळुंके, विकी राजे पाटील, निलेश ढवळे, सुकन्या भोसले, सुवर्ण मोहिते, प्रशांत इंगळे आदी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थिती होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.