आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लज्‍जास्‍पद:उच्चशिक्षित पत्नीचा छळ; घर, कारसाठी पैशाचा तगादा, विदेशात नेल्यानंतरही अभियंता पतीकडून मारहाण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमसीएचे शिक्षण घेऊन पुण्याच्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेचा अभियंता पतीने घर, कारसाठी माहेरहून पैसे आणावे म्हणून अतोनात छळ केला. मानसिक, शारीरिक अत्याचार केले. नोकरी सोडायला लावली. विदेशातून आठ दिवसांपूर्वी परतल्यानंतर पासपोर्ट व व्हिसा ताब्यात घेत बेदम मारहाण केली. अखेर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून पती अमोल नामदेव आढावेसह कुटुंबातील सात जणांवर सातारा पोलिसात गुन्हा दाखल झाला.

२८ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३ ऑगस्ट रोजी नोंदणी पद्धतीने अमोलसाेबत लग्न झाले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी धार्मिक रीतिरिवाजानुसार पुन्हा लग्न केले. काही दिवस चांगली वागणूक दिली. नंतर क्षुल्लक कारणांवरून त्रास देणे सुरू केले. सासू-सासऱ्यांनी पतीविषयीच उलटसुलट सांगून भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर तुझ्या वडिलांकडून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत टोमणे मारणे सुरू केले. आपल्या मुलीला त्रास नको म्हणून तिच्यावडिलांना अपमानित करून हाकलून दिले. २८ सप्टेंबर रोजी ते भारतात आले. मात्र, तिची महत्वाची कागदपत्रे सिंगापूरच्या घरीच ठेवले. पासपोर्ट व व्हिसा घेऊन दसऱ्याला कार घेण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. ४ ऑक्टोबर रोजी मुलगी वडिलांसोबत सासरी गेली. तेव्हा वडिलांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा अपमानित करुन हाकलून लावले. त्यानंतर मुलीला बेदम मारहाण केली. नणंदोई सिद्धार्थ जमधडे याने हात धरुन लज्जास्पद प्रकार केला. त्यामुळे संतापून मुलीने ११२ या नियंत्रण कक्षाला कॉल केला असता मोबाईल हिसकावून घेतला. दामिनी पथकाला हा प्रकार कळताच त्यांनी घरी धाव घेतली. उपनिरीक्षक गोरे यांनी मुलीला ठाण्यात नेऊन तिला रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर अमोल, सिद्धार्थवर विनयभंगासह इतरांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर शिरसाठ अधिक तपास करत आहेत.

नोकरी सोडायला लावून सिंगापूरला नेत छळले तक्रारदार तरुणीने नामांकित महाविद्यालयातून एमसीएचे शिक्षण घेतले आहे. तिची आई सरकारी नोकरी करते तर वडील कंत्राटदार आहेत. तिच्या दाेन्ही बहिणी उच्चशिक्षित आहेत. पती अमोल एका आंतरराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहे. तरुणी पुण्याच्या एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत हाेती. परंतु अमोलची सिंगापूरला बदली झाल्याने त्याने तिला नोकरी सोडायला लावून सोबत येण्याचा हट्ट केला. तेथेही त्याने शारीरिक, मानसिक त्रास दिला. विदेशात असल्याने मी त्रास सहन केला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...