आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएमएचे आओ गाव चलो अभियान:5 गावात 1 वर्ष मोफत आरोग्यसेवा; शहरातील डॉक्टरांनी गावी सेवा देणे अभिमानास्पद - हरिभाऊ बागडे

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शहर शाखेतर्फे पाच गावे दत्तक घेण्याचा मानसअध्यक्ष डॉक्टर यशवंत गाडे आणि सचिव डॉ. अनुपम टाकळकर यांनी व्यक्त केला. त्याची प्रत्यक्ष सुरुवातच आज पांढरी पिंपळगाव या खेडेगावातून झाली. महाराष्ट्र सरकारचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आणि आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा हा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. या माध्यमातून आयएमए च्या माध्यमातून पाचही गावांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.

यावेळी आएएमएचे अध्यक्ष डॉ. यशवंत गाडे, सचिव अनुपम टाकळकर डॉ. उज्वला दहिफळे समन्वयक डॉ. योगेश लक्कास, डॉ. राजेंद्र शेवाळे, डॉ. अमोल उबाळे, डॉ. अमोल देशमुख, डॉ. शैलेश लटुरिया, डॉ. गितेश दळवी, डॉ. गिरीश मोरे, डॉ. अर्चना भांडेकर, डॉ. उज्वला झवर, डॉ.अर्चना शिरसीकर, डॉ.अंजली गाडे डॉ. राजीव मुंदडा डॉ. आसावरी टाकळकर,डॉ. वैशाली सुरासे, डॉ.कुलदीप बावळे आदी तज्ञ डॉक्टर मंडळींची उपस्थिती ह्या हया कार्यक्रमास होती.

गावाकडे डॉक्टर येणे अभिमानाची गोष्ट

यावेळी बागडे यांनी शहरातील तज्ञ मंडळी गावाकडे येत असून गावातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेत आहेत ही एक अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तर भुमरे यांनी पूर्वीच्या काळी काही गंभीर आजार झाल्यास मुंबई किंवा पुण्याला जावं लागत असे.मात्र आता आपल्या जिल्ह्यातल्या डॉक्टरामुळे मुंबई पुण्याच्या चकरा वाचल्या असल्याचे सांगत त्याचे कौतुक केले.

गावाची जबाबदारी आता आमची

यावेळी गाडे म्हणाले, या गावाची जबाबदारी आता आयएमएची असून वैद्यकीयच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, मानसिक अथवा इतर कुठलीही मदत लागल्यास आमच्याशी संपर्क करावा. विविध वैद्यकीय रोगनिदान आणि संपूर्ण उपचार शिबिरांचे आयोजन वर्षभर केले जाईल. या शिबिरांमधील आलेल्या रुग्णांचे पुढील उपचार देखील वैद्यकीय तज्ञ त्यांच्या त्यांच्या दवाखान्यात करतील. केवळ वर्षभरासाठीच नव्हे तर पुढच्या वर्षी देखील ही योजना सुरू राहील.

टाकळकर म्हणाले की आठवी नववी आणि दहावीच्या प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत पुस्तके आणि वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य आय एम ए तर्फे देण्यात येईल. तसेच अकरावी बारावीच्या होतकरू गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरात वस्तीगृहाची व्यवस्था देखील आय एम ए करणार आहे.या वेळी गावातल्या नागरिकांच्या बोन डेन्सिटी कॅम्प , शुगर डिटेक्शन कॅम्प, आणि ब्लड प्रेशर स्क्रीन कॅम्पचे आयोजन केले.