आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीवर सत्तेसाठी मविआ, भाजपचे प्रयत्न:बागडे, काळे आखताहेत रणनिती, ग्रामपंचायत, सोसायट्यांची सुधारीत प्रारूप यादी प्रसिद्ध

छत्रपती संभाजनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. हमाल, मापडी, व्यापारी मतदार संघांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. तर ग्रामपंचायती व सोसायट्यांची सुधारीत यादी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८ मार्चपर्यंत त्यावर हरकती, आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यावर सहा जणांनी नाव बदल आदीबाबत अक्षेप नोंदवला आहे. त्यावर १४ मार्चला सुनावणी होईल.

कोरोनामुळे बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक दीर्घकाळ लांबणीवर पडली आहे. त्यात मतदार याद्यावरूनही चांगलाच संघर्ष बघायला मिळाले. नंतर निवडून आलेल्या मतदारांचा समावेश करून घेण्याचा निर्णय झाला. त्याच्या अंमलबजावणीसाठी मतदार संघांच्या सुधारीत याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सोमवारी ग्रामपंचायती व सोसायट्या मधील मतदारांची सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावर कुणाचे काही आक्षेप, हरकती असतील तर त्यांनी ८ मार्चपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवायचे होते.

त्यावर १४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. तीन दिवस पुन्हा यासाठीच वेळ देऊन २० मार्च रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर निवडणूकीचा पुढचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम जाहीर होईल. बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे शेतकरी, आडत व्यापारी, राजकारण्यांचे अतिशय बारीक लक्ष लागून आहे. गत निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती.

लकी ड्रॉ झाले होते. फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेस व भाजप असे दोघांनीही सत्तेचा उपभोग घेतला आहे. तर प्रशासकीय काळातही दोन्ही पक्षांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते हे विशेष. तसेच पुन्हा बाजार समितीवर झेंडा फडकवण्यासाठी महाविकास आघाडी आणि युतीकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे व काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यासाठी रणनिती आखत आहेत.

यावर आगामी जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे अवघड गणित सोप करण्यासाठी मदत होते. त्यामुळेच बाजार समिती संचालक मंडळांची निवडणूक अगदी चुरशीची होते. यंदाही तेच चित्र बघायला मिळेल, यासाठी सर्वांना उत्सुकता लागली आहे

बातम्या आणखी आहेत...