आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षवर्धन जाधवांची रावसाहेब दानवेंना भावनिक साद:कन्नड अन् मी तुमचाच; म्हणाले - रेल्वे सेवा सुरू करा; तुमच्या पायावर नाक घासेन

कन्नड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना जर कन्नड जिंकायचे असेल तर माझ्यासोबत त्यांचे जे काही वैयक्तिक वाद, न्यायालयीन विषय असतील ते बाजूला ठेवावे आणि कन्नडसाठी रेल्वे सुरू करावी. कायमस्वरूपी कन्नड तुमचे आणि मी तुमचाच होईल, अशी भावनिक साद माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना शनिवारी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत केली आहे.

हर्षवर्धन जाधव म्हणाले की, केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज विविध विकास कामाच्या उदघाटनसाठी तालुक्यातील देवगाव रंगारी येथे येत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर जाधव यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित करत ही साद घातली आहे.

रेल्वे प्रश्न सोडवावा

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब शिंदे गेल्या वीस वर्षापासून सातत्याने सांगतात की रेल्वे सुरू करा म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांनी पत्र व्यवहार देखील केला आहे. आता तुम्ही रेल्वेमंत्री आहात. त्या मंत्र्याच्या कक्षात जो विभाग येतो त्या विभागाचे काम तो मंत्री आपल्या भागात जास्तीचे करत असतो ही दिल्लीची परंपरा आहे. आपण तर आता आमच्या भागाचे मंत्री आहात. रेल्वेचा प्रश्न आपण सोडवावा.

मी पायावर लोटांगण घेईल

माजी आमदार जाधव म्हणाले की, रेल्वे धडा धडा ज्या दिवशी त्या मतदारसंघातून धावेल त्या दिवशी हा मतदारसंघ साहेब तुमच्या पायावर लोटांगण घेईल. आपली इच्छा आहे की हर्षवर्धन जाधव यांनी माझ्या पायावर लोटांगण घ्यावे मी तुमच्या पायावर लोटांगण घेतो. तुम्ही पहिल्यांदा रेल्वे सुरू करा. तुमचे जे अजून जे काही म्हणणे आहे की, हर्षवर्धनला मी नाक घासत आणेल. मी नक्कीच नाक घासेन. मला कुठलाही अहंकार नाही, पण पहिले माझी रेल्वे तुम्ही सुरू करा. कारण विकास महत्त्वाचा आहे, अहंकार नाही. आपले आपसात जे काही असतील ते वाद महत्त्वाचे नाहीत कन्नडसाठी रेल्वे सुरू करा कन्नड तुमचे आणि मी तुमचाच आहे.
दानवेंची भेट घेण्याची इच्छा

माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मी वैयक्तिक एक निवेदन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्यक्षात भेटून देण्याची माझी इच्छा आहे आणि तशी तयारी करून ठेवली आहे. मात्र, जर परवानगी मिळाली तरच मी त्यांना भेटू शकतो. कारण ते एक केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना सुरक्षा मोठी आहे. त्यामुळे त्यांनी जर मला भेटण्याची परवानगी दिली मी स्वत: जाऊन भेटून या मागणीचे एक निवेदन देण्याची माझी तयारी आहे. उद्या दहा वाजेपर्यंत जर त्यांनी भेटण्याची परवानगी दिली तर ठीक, नाही आली तर भाजपच्या तालुका अध्यक्षाकडे ते निवेदन देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...