आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:जालना लोकसभेत रावसाहेब दानवेंना पाडले नाही तर हर्षवर्धन जाधव नाव लावणार नाही

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'हाऊ मच' वाले खासदार कसा विकास साधणार

राजकारण सोडून शांत जीवन जगण्यासाठी पुणे येथे गेलो, तेथेही चुकीचे गुन्हे नोंदवून मला संपवण्याचा डाव असल्याने मी आता परत राजकारणात येणार असून, जालना लोकसभेत रावसाहेब दानवे यांना पाडले नाही तर हर्षवर्धन नाव वापरणार नसल्याची घणाघाती टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथे मंगळवारी(दि.९) केली.

पुणे येथील कारागृहातून जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी जाधव यांनी सहकारी इशा झा यांच्यासह कन्नड शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार दानवे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पुणे येथील घटनेत खासदार दानवे यांच्या दबावात पोलिसांनी चुकीचा गुन्हा नोंदवला, मात्र माननीय उच्च न्यायालयाने सदर गुन्हा चुकीचा असल्याचे म्हटल्याने, मला जामीन मिळाला. या आधीही माझ्या विरोधात खासदार दानवे यांनी चुकीचा अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल केला होता.

नंतर वाद, भांडण नको म्हणून मी राजकारण सोडून, शांततेत समाजकार्य करण्याचे ठरवले होते. मात्र, खासदार दानवे हे मला जगू देत नाहीत. त्यामुळे आता मी पुन्हा राजकारणात येऊन, रावसाहेब दानवेंना जालना लोकसभेत पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. येत्या १८ तारखेपासून मी पुन्हा राजकारणात येण्याची सुरुवात करणार असून, त्या दिवशी तालुक्यात विजयी सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करणार आहे.

पुढे ते म्हणाले की, खासदार दानवे यांनी विधानसभेत मला पाडण्यासाठी तत्कालीन मंत्री लोणीकर यांच्या जावयाला उभे केले. त्यामुळे मी पडलो. निवडून आलेल्या आमदारांचा प्रशासनावर वचक नसल्याने, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस, तहसीलदार कोणीच काही ऐकत नाही. त्यामुळे खासदार दानवे यांनी माझेच नाही तर तालुक्याचेही नुकसान केले आहे. यावेळी उपसरपंच सुशील गंगवाल, माजी सभापती राजेंद्र मगर, यासिन शेख, श्रीराम घुगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

जेलमध्ये असताना मुलाविरोधात पॅनल

पत्नी संजना जाधव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, एखाद्या महिलेने त्यांच्या पतीशी वाद असल्यास त्यांच्या विरोधात राजकारण केल्याचे मी बघितले आहे. मात्र,एखाद्या महिलेने आपल्या मुलाच्या विरोधात पॅनल उभे केल्याचे मी बघितले नाही. कन्नड तालुक्यातील झळकणाऱ्या बॅनरवरून संजना जाधव यांची राजकीय इच्छा लपून राहिलेली नाही. पती जेलमध्ये असताना या महिलेने मुलाविरोधात पॅनल टाकले. कशासाठी हा अट्टाहास तर आमदारकीसाठी, तोंडाने मागितली असती तर देऊन टाकली असती. एवढा खटाटोप कशासाठी?

'हाऊ मच' वाले खासदार कसा विकास साधणार

खा.दानवे यांच्यावर टीका करताना हर्षवधन जाधव म्हणाले की, 'हाऊ मच' या दोन शब्दांपलीकडे इंग्रजी माहीत नसलेले भारताच्या संसदेत बसले आहेत हे काय विकास साधणार? देश-विदेशात अशा खासदारांमुळे भारताची प्रतिमा मलिन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...