आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे आंब्याचा गळून पडला माेहाेर:पावसामुळे हरसूल, डांगसौंदाणे, अभोणा, मनमाडला कांद्यासह आंब्याला फटका

हरसूल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरसूल, ठाणापाडा परिसरात होळी सण व यात्रेची तयारी सुरू असताना शनिवारी (दि. ४) रात्री पावसाने हजेरी लावल्याने शेकडो आंबा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. हरसूल परिसरात ३ मार्चपासून वातावरणात अचानक बदल जाणवत हाेता. दमट हवामान झाल्याने आंब्याला आलेला मोहोराच्या गळतीस सुरुवात झाल्याने आंबा उत्पादक हवालदिल झाला होता. त्यातच शनिवारी मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली. हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मोहोर व छोट्या आकारातील आंबा फळाची मोठ्या प्रमाणात गळ झाली. कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोह फुलाची गळ उशिरा सुरू झाली असताना बदललेल्या हवामानाने व पावसाने मोह फुलांना फटका बसणार आहे.

आंबा बाजारात उशिराने येणार यावर्षी परिसरात आंब्याचा मोहोर पूर्णपणे बहरला होता. मात्र, शनिवारी रात्री अचानक आलेल्या पावसामुळेे मोहोर गळाला. आंबा फळांचे नुकसान झाले आहे. माझ्या ७०० आंबा झाडांवरील सुमारे ८० टक्के मोहाेर खाली गळाला आहे. यामुळे उर्वरित फळ उशिराने बाजारात येण्याची शक्यता आहे. -गणेश महाले, शिरसगाव

बातम्या आणखी आहेत...