आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी:चोरलेली दुचाकी परत करण्यासाठी 15 हजार रुपयांची खंडणी मागितली ; दुचाकीवरून वाद सुरू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्याची दुचाकी महाविद्यालयातूनच चोरली. त्यानंतर चोर माझ्या ओळखीचा असल्याचे सांगत ती परत देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाचही मागितली. वेदांतनगर पोलिसांनी सापळा रचून अविनाश राजू खरात ऊर्फ बादशाह (२१) याला अटक केली. सुमीत दिलीप क्षीरसागर (२२) आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेतो. नातेवाईक गजानन लक्ष्मणराव सोनवणे यांची दुचाकी वापरून तो महाविद्यालयात ये-जा करत होता. ३० मे रोजी सकाळी त्याची दुचाकी चोरीस गेली. त्याचा मित्र वैभव भवरने ही माहिती अविनाशला दिल्यावर त्याने १५ हजारांची मागणी केली. त्यानंतर अविनाशने त्याला १ मे रोजी एक वाजता गाडे चौकात बोलावले. तेथे त्यांच्यात पैसे व दुचाकीवरून वाद सुरू झाला. तेथे साध्या वेशातील पोलिसांनी विचारपूस करताच सुमीतने सर्व प्रकार सांगितला. पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक प्रमोद देवकते हवालदार मनोज गांगे, प्रशांत नरवडे, गजानन तारे, फकिरा तडवी, संतोष कासवे यांनी अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार अ‌िवनाश तीन महिन्यांपू्र्वी आयटीआय उत्तीर्ण झाला पण त्याने नोकरीऐवजी चोरीचा मार्ग शोधला.

बातम्या आणखी आहेत...