आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोपेंचा राज ठाकरेंना टोला:म्हणाले- शरद पवारांवर आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा, खरे जातीयवादी राज ठाकरेच

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वारंवार जातीयवादी असल्याची टीका करीत आहेत. यावर राष्ट्रवादीच्या गोटातही निराशा पसरत आहे. त्यावरून आता राज ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमारही होत असून राजेश टोपे यांनी राज ठाकरेंना चोराच्या उलट्या बोंबा अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

​​​​​​राज ठाकरे यांची गुडीपाडवा मेळावा असो, उत्तर सभा असो की औरंगाबादची सभा या सर्व सभेत शरद पवारांवर राज ठाकरे यांनी जोरदार प्रहार केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा जातीयवादी असा उल्लेख केला त्यानंतर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद फोफावला असा आरोप केला होता त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अजूनही राज यांच्याविरोधात संतप्त भावना आहेत.

काय म्हणाले राजेश टोपे

मंत्री राजेश टोपे यांनी राज ठाकरे यांनी शरद पवारांना जातीयवादी म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका केली आहे. काही वर्षापुर्वी राज ठाकरे हे शरद पवारांचे गोडवे गात होते, त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत होते. आता मात्र अचानक त्यांना शरद पवार हे जातीयवादी दिसू लागले आहेत. याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतयं असंच म्हणावे लागेल. याला मराठीत चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणतात, असा टोला देखील टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना लगावला.

खरे जातीयवादी राज ठाकरे

शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप करण्याआधी स्वतः राज ठाकरे राज्यात सध्या ज्या पद्धतीचे राजकारण करत आहे, यावरून खरे जातीयवादी कोण हे स्पष्ट होते. उलट राज ठाकरे यांनीच आता आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देखील टोपे यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...