आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या मुलीला चटके देणाऱ्या पित्यावर गुन्हा:पत्नी सोडून गेल्याचा मुलीवर काढत असे राग

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईने लहानपणीच दुसरे लग्न केले. नंतर कधीच संपर्क केला नाही. घरात अपंग वडील व १३ वर्षांची मुलगी असे दोघेच राहिले. पत्नी सोडून गेल्याचा राग कायम मुलीवर काढत वडिलांनी तिचा अतोनात छळ सुरू केला. न विचारता दूध फ्रिजमध्ये ठेवल्याच्या कारणावरून त्याने तीन दिवसांपूर्वी मुलीला चटके दिल्याचा प्रकार समोर आला. जिन्सी पोलिसांनी वडिलांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करताच तो पसार झाला.

१३ वर्षांची साना (नाव बदलले आहे) जिन्सी परिसरात वडिलांसोबत राहते. काही वर्षांपूर्वी सानाच्या आईने दुसरे लग्न करत घर सोडले. त्यामुळे साना एकटी पडली. काही महिने आत्या तिला घेऊन गेली होती. परंतु दाेन वर्षांपूर्वी तिची आजी तिला पुन्हा शहरात घेऊन आली. तेव्हापासून ती वडिलांकडे राहत होती. अपंग वडिलांनी मात्र पत्नी सोडून गेल्याचा राग सानावर काढायला सुरुवात केली. अभ्यास सोडून तिला घरातील धुणे, भांडी, स्वच्छतेचे काम, आजीकडून जेवणाचा डबा आणणे बंधनकारक केले. त्यात चूक होताच तिला मारहाण करणे,चटके देणे सुरू केले. साराने भीतीपोटी हा सर्व प्रकार सहन केला.

३ मार्च रोजी सानाने दूध आणून फ्रिजमध्ये ठेवले. मात्र, न विचारता ते ठेवल्याने वडिलांनी उकळलेल्या दुधाचे पातेले तिच्या गालावर ठेवत चटके दिले. साना किंचाळत रडू लागताच शेजारच्यांनी धाव घेऊन पोलिसांना बोलावले. निरीक्षक अशोक भंडारे यांनी सानाची विचारपूस करताच तिने वडील करत असलेल्या छळाचा पाढाच वाचला.

बातम्या आणखी आहेत...