आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरुणाच्या एका घोळक्याला गुटखा खाऊन थुंकणे चांगलेच महागात पडले. पोलिसांनी पकडून दंडात्मक कारवाई करताना त्याच्याकडे छर्ऱ्याचे पिस्टल आढळले. पोलिसांनी थुंकण्यासह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून पिस्टल व दुचाकी जप्त केली. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे अंमलदार चंद्रकांत पोटे सहकाऱ्यांसह गस्तीवर होते. त्यांना सेव्हन हिल्स उड्डाणपूल परिसरात एक तरुण गुटख्या खाऊन थुंकताना आढळला. त्यांनी तत्काळ त्याला व त्याच्या मित्राला पकडले. त्यांची नावे रवी आसाराम दुबे (२८), आकाश प्रकाश अहिरे (२२, रा. दोघेही पाचोड) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. मात्र, गुटख्याच्या जागी थेट पिस्टल आढळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.