आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष यात्रा:पाणी संघर्ष यात्रा काढून मनसैनिक जनतेतून २५ हजार पत्रे लिहून घेणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर्सूल तलाव ते जटवाडा नवीन पाइपलाइन दहा दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करता. मग जायकवाडी ते नक्षत्रवाडी पाइपलाइन टाकण्यासाठी २५ वर्षे का लागली, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. शहराच्या पाणी समस्येवर १४ मेपासून पाणी संघर्ष यात्रा काढून घरोघरी जाऊन २५ हजार लोकांकडून पत्रे लिहून घेणार आहोत. नंतर ही सर्व पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त आहेत. गेल्या २५ वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. अनेक भागांत रात्री ३ वाजता पाणी सोडले जाते. काही ठिकाणी लाइनमनला कोणत्या भागात पाणी सोडायचे, कोणत्या भागात नाही यासाठी दबाव टाकला जातो. मनपा प्रत्येक टँकरवर जीपीएस बसवणार होती. मात्र, ८५ पैकी ४० टँकरलाच जीपीएस बसवले. ज्या ठिकाणी टँकर भरले जातात, तेथे बारकोड यंत्रणा का बसवली नाही, असा सवाल खांबेकर यांनी केला. पत्रकार परिषदेत सतनामसिंग गुलाटी, आशिष सुरडकर, संकेत कुलकर्णी, बिपीन नाईक उपस्थित होते.

अयोध्येला जाणारच :

प्रकाश महाजन म्हणाले की, अयोध्या एक तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी कोणी जाण्यास रोखू शकत नाही. औरंगाबादेतूनही पाच ते सहा हजार कार्यकर्ते आपापल्या सोयीनुसार जातील. आम्ही रस्त्याने जाणार. आंध्र प्रदेश, कर्नाटकातील लोक शिर्डीत पूजाविधी करण्यासाठी येतात. त्यांना कुठेही अडवण्यात येत नाही. अयोध्येला जाण्याचा आमचा हक्क आहे.

बातम्या आणखी आहेत...