आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद-नगर महामार्गावर उभ्या पिकअपला भरधाव कारने धडक दिल्याने कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यात कारचालक किशोर कळसकर (वय 27, हल्ली मुक्काम वाळूज) याचा जागीच मृत्यू झाला.
वाळूजहून भरधाव वेगात कायगावच्या दिशेने जाणाऱ्या या कारने महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या महिंद्रा बोलेरो या पिकअपला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, पिकअप वाहनातील लोखंडी पाईप कारच्या समोरील काचातून आरपार घुसून मागून निघाले होते. त्यातच किशोर जखमी होऊन ठार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.
मूळ कायगाव (गणेशवाडी) येथे राहणारा किशोर हा बजाज ऑटो कंपनीत कंत्राटी पद्धतीने सुपरवायझर म्हणून काम करतो. सध्या तो वाळूज येथे वास्तव्यास असून शेतीकडे जाण्यासाठी तो त्याच्या कारमधून एकटाच वाळूज मार्गे गणेशवाडीच्या दिशेने निघाला होता.
दरम्यान, अंधारामुळे महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वाहनाचा किशोरला अंदाज आला नाही. त्यामुळे त्याची कार समोरील पीकअप वाहनावर जोरदार आदळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेशुद्धावस्थेत असणाऱ्या किशोरला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.