आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:महात्मा फुले समता परिषदेतर्फे आरोग्य तपासणी शिबिर; क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

महिला स्वावलंबनासाठी प्रशिक्षण6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगपुरा येथील फुले दांपत्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते त्याचा निषेध करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झाले. या वेळी अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. अनिल धुळे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र धनवई, मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील धुळे, भूलतज्ज्ञ डॉ. कुंदा धुळे यांनी १५० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. राधिका तडवळकर यांनी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रकारचे केक्स बनवण्याचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्षा डॉ. सरोज नवपुते, शहाराध्यक्षा सुभद्रा जाधव, कांचन घोडके, धनश्री तडवळकर, अरुणा तिडके, मालती निकम, सुनीता गादे, रिना जाधव, निशांत पवार, गजानन सोनवणे, चंद्रकांत पेहरकर, योगेश हेकाडे, किशोर माळी, बाळू सोनवणे आदींनी सहकार्य केले.या वेळी आनंदा ढोके, प्रा. संतोष वीरकर, कीर्ती शिंदे, जयराम साळुंके, एल.एम. पवार, गणेश काळे, सुरेश गाजरे, लक्ष्मण हेकडे, ज्ञानेश्वर जेजूरकर, गणेश हिवाळे, पुष्पा घोडके, वंदना घोडके, सरस्वती हरकळ, पूजा ढोके, शिवाजी जाधव, कृष्णा ढोके, अर्जुन सोनवणे, तय्यब शहा, उमेश उबाळे, अनिल क्षीरसागर, हरिभाऊ पवार, किशोर लोखंडे, तनुजा जाधव, काशीनाथ जाधव, संजीवन घोडके, विनायक पाराशर, द्वारका पवार, केतन हेकडे, अशोकसिंग शेवगण, पंडितराव तुपे, सुबोध तडवळकर, वैशाली तडवळकर, संदीप घोडके, विराज घोडके आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...