आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूसदृश:डेंग्यूसदृश रुग्णांच्या नोंदीसाठी आरोग्य विभागाची खासगी रुग्णालयात धाव

वाळूज10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्योगिक परिसरात डेंग्यू, कावीळ, मलेरिया आदी साथरोगांचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने दैनिक दिव्य मराठीने २२ सप्टेंबर रोजी ‘वाळूजमध्ये डेंग्यूमुळे ८ जणांचा मृत्यू, नोंद तीन जणांची, ६७ रुग्णांवर उपचार’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. याची तत्काळ दखल घेत आरोग्य विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, सिडको व एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य विभागामार्फत खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नोंदी, मृत्यू पावलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आली. तसेच खासगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती देण्यासंदर्भात ताकीदही देण्यात आली. शिवाय प्रशासनाकडून धूर फवारणीला सुरुवात झाली.

प्रकडून सकारात्मक प्रतिसादशासना
वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीने २२ सप्टेंबर रोजी सकाळीच जिल्हा परिषद शाळा व त्याभोवतीच्या परिसरात धूर फवारणी केली. सिडको प्रशासनाने वेळापत्रक तयार करत त्या-त्या परिसरात फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या परिसरात फवारणी होत नसल्यास किंवा फवारणी कधी होणार याबाबतची माहिती कार्यालयातून उपलब्ध होईल, अशी माहिती अधिकारी अस्मिता विरशीद यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...