आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:सुधारगृहातील 22 मुलांची आरोग्य तपासणी, औषध वाटप

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाऊनतर्फे शहरातील बालसुधारगृहामध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये २२ मुलांची तपासणी करण्यात आली. सर्वांना जंतांची औषधे दिली, तर तीन जणांना डोळ्यांचे आजार आढळले आहेत. बालरोगतज्ज्ञ डाॅ. प्रफुल्ल सकलेचा यांनी बालकांची तपासणी केली. तर, क्लबच्या सदस्या डॉ. अनिता देशपांडे यांनी मुलांची नेत्र तपासणी केली. मुलांना नि:शुल्क औषधे दिली. या वेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष दिव्या मराठे यांनी जास्तीत जास्त मदत करण्याचे अश्वासन दिले. बालकांना फळे व बिस्किटे वाटण्यात आली. सुधारगृहाचे अधिकारी शेख फयाजुद्दीन, चंद्रभान जंगले, सदस्य अनिता शिवुरक, निकेत अर्पल, मनोज देशमुख, रामेश्वर पवार, विनोद शिनगारे, उल्हास मराठे उपस्थित होते.

शाश्वत उपक्रम आराेग्यावर जनजागृती, उपचार हा शाश्वत चालणारा उपक्रम आहे. राेटरीचा भर शाश्वत उपक्रमांवर अधिक प्रमाणात असताे. त्यामुळे समाजातील ज्या घटकांच्या आराेग्याकडे कुणीही लक्ष देत नाही त्यांच्याकरिता आम्ही हा उपक्रम घेत आहाेत. दिव्या मराठे, अध्यक्ष, राेटरी क्लब औरंगाबाद मिडटाऊन

बातम्या आणखी आहेत...