आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:आधार वृद्धाश्रमात 35 ज्येष्ठांची आरोग्य तपासणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड बायपास येथील आधार वृद्धाश्रमात शनिवारी ३५ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी एका शिबिरातून करण्यात आली. हेल्प रायडर, आयआरसी, एनपीओसह अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या वेळी मातोश्री वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठांनीही हजेरी लावली होती. घाटीतील जेरियाट्रिक विभागातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तर आयआरसीतर्फे औषधोपचार तसेच रक्त तपासण्या करण्यात आल्या. या वेळी अॅड. फैज सय्यद, संदीप कुलकर्णी, ख्वाजा शरफोद्दीन, गिरिजाराम हाळनोर, गणेश डोणगावकर यांची उपस्थिती होती.

शिबिरात २० ज्येष्ठांची रक्त तपासणीही करण्यात आली. आश्रमातील बऱ्याच महिला व पुरुषांना बीपी शुगर नसली तरी हाडांचे, डोळ्यांचे आजार असल्याचे निदर्शनास आले. अनेकांना कॅल्शियम, मल्टी व्हिटॅमिनची औषधी देण्यात आली.

या वेळी माजी नगरसेवक गिरिजाराम हाळणोर म्हणाले की, वृद्धाश्रम संस्कृती भारताची नाही, ही तर पाश्चात्त्य संस्कृती आहे. हिंदू धर्मात चार आश्रम आहेत. पण त्यात वृद्धाश्रमाचा समावेश नाही. परंतु जर कोणाचा कोणीच नसेल अशावेळी वानप्रस्थाश्रमास वृद्धाश्रम समजून परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपस्थित ज्येष्ठांनी घरात असतानाचे घडलेले किस्से सांगताना डोळे पाणावले. आपल्याला परत जाण्याची खूप इच्छा आहे, परंतु परिस्थती तशी नाही, याची जाणीवही ते सांगत असलेल्या किश्श्यांवरून उमजत होते.

वृद्धाश्रम व्हावे अशी शुभेच्छा देणार नाही : अॅड. सय्यद
अॅड. फैज सय्यद यांनी वृद्धाश्रमात राबवलेला उपक्रम चांगला असला तरी असे आश्रम व्हावे, याची शुभेच्छा कधीच देणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, पाश्चात्त्य देशांत वृद्धांना साहित्य म्हणून टाकले जाते. ते साहित्य नव्हे जुने ते सोने आहे. आपल्या संस्कृतीत ज्येष्ठ साहित्य नव्हे, आपल्याला निर्माण करणारे आहेत. त्यांचा आदर करा. त्यांच्यावर खर्च करा. त्यांना सांभाळा, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला.

बातम्या आणखी आहेत...