आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ कोरोनापासूनच नव्हे तर शाळांमध्ये असलेल्या शारीरीक शिक्षण परिसर अभ्यास यामध्ये देखील वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेविषयी जागृती करणारा अभ्यासक्रम आहे. परंतु, आता पूर्वीप्रमाणे स्वतंत्र शारीरीक शिक्षण हा विषय राहिला नाही. तर स्लम आणि वाड्या वस्तीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त हे धडे कसे पोहचवणार? अशा प्रश्नावरुन डॉ. हेडगेवार रुग्णालयाअंतर्गत असलेल्या सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या माध्यमातून शहरातील 3 हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही फाइव्ह हेल्दी हॅबीट पोचविण्यात आली आहे.
रोज स्वच्छ अंघोळ करावी, दात घासावेत, हाताची नखे वाढवून नयेत ती नियमित कापावीत ह्या गाेष्टी तशा शाळेत नियमित शिकवल्या जातातच. परंतु, वस्ती आणि झोपडपट्टी असलेली सामाजिक आणि आर्थिक स्थिती, शिक्षणाविषयी असलेली अनास्था आणि गरीबी, आरोग्याकडे असलेले दुर्लक्ष यामुळे साफू अंतर्गत वडगाव, कोल्हाटी, गांधी नगर, सिंधीबन आणि चेतनानगर, हर्सूल या सारख्या भागांमध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पोस्टर्ससह विविध उपक्रमांच्या माध्यमातून फाइव्ह हेल्दी हॅबीट हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याचे दिले जातेय ज्ञान
ज्यात स्वच्छ राहणे, दात घासणे, हात स्वच्द धुण्याची पद्धत, जंक फुड टाळणे, नखे कापने शाळेत अथवा बाहेर जातांना जेवण करुन जाणे आदी विषयी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गर्शन केले जाते. एव्हढेच नाही तर या कृती कशा कराव्यात याचा डेमो देखील दिला जात असल्याचे आरोग्य अधिकारी डॉॅ. सई पाटील यांनी सांगितले.
कोट -
विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती -
या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये शालेय दशेपासूनच आरेाग्य जनजागृतीचे काम करतो आहे. ज्यात हेल्थ कॉर्नर मध्ये एक आठवडा प्रत्येक शाळेत दिला जातो. आपला आहार कसा असावा, डेंगू, अॅनिमिया, क्षयरोग, पंचकोश या विषयी जागरुक्ता केली जाते पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही जनजागृती केली जात असून, आता पर्यंत आम्ही तीन ते साडेतीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलो आहे.
विशाल बेदरे मेडिकल ऑफिसर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.