आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळच्या ट्रॉमा केअर सेंटरचा प्रस्ताव द्या:आरोग्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जयंती उत्साहात, स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी एक कोटी ४१ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता

वेरूळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्मारकासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यावर अधिक भर राहील तसेच वेरूळ येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या मागणीबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर देण्यात यावा, शासनाचे वेरूळच्या सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भ्रमणध्वनीवरून उपस्थितांना दिली.

नागपूर संस्थानचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष इंजि. विजय घोगरे, पानिपत येथील मराठा उत्थान समितीचे अध्यक्ष मराठा रामनारायण, नवी दिल्ली येथील ॲड. राजसाहेब पाटील, राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदेचे सभापती महेश पाटील बेनाडीकर, आंध्र प्रदेशचे सामाजिक समरसता संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णा किशोर, महाराजा सयाजीराव गायकवाड न्यायदान कक्षाचे महासचिव ॲड. आशिषराजे गायकवाड, वेरूळचे जिल्हा परिषद सदस्य हिंदवी खंडागळे, वेरूळच्या सरपंच कुसुम मिसाळ, माजी सरपंच प्रकाश पाटील, प्रा. गंगाधर बनबरे, स्मारक समितीचे सदस्य किशोर चव्हाण, विलास पांगरकर, तानाजी हुसेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. त्र्यंबक पाटील, प्रा. आर. एम. दमगीर, राजेंद्र दाते, मनोज आखरे आदींची उपस्थिती होती.

मंत्री टोपे म्हणाले की, स्मारकाच्या कामांसाठी सदैव स्मारक समितीच्या सोबत आहे. वेरूळ येथील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचे सांगत वेरूळच्या विकासाला प्राधान्य असल्याचे म्हणाले. नागपूर संस्थानचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी नागपूरचे भोसले घराणे हिंदवी स्वराज्याचे विस्तारक आहे.

शहाजी स्मारकासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी नागपूरचे भोसले घराणे तत्पर आहे. स्मारकाच्या मागील बाजूस जवळपास १३६ एकरचा तलाव मालोजी राजांच्या कारकीर्दीतील आहे. त्याचाही समावेश स्मारक निर्मितीत करून जागतिक पातळीवरील दर्जेदार स्मारक व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे भोसले म्हणाले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शहाजीराजांच्या स्मारकासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी प्रशासनाने एक कोटी ४१ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुंदर आणि जागतिक पातळीवरील स्मारक व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. वेरूळच्या ट्रॉमा केअर सेंटरचाही लवकरच प्रस्ताव पाठवू, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

परराज्यातील सर्व मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या
परराज्यातून आलेल्या सर्व मान्यवरांनी भावना व्यक्त करत शहाजीराजांच्या स्मारकास अभिवादन केले. या वेळी मान्यवरांनी दिवंगत मिलिंद पाटील, प्रा. देविदास वडजे यांच्या कार्याचा गौरव केला. त्याचबरोबर सद्य:स्थितीत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या इतर मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. प्रास्ताविक किशोर चव्हाण यांनी केले. सुरुवातीला घोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन शहाजीराजेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाहीर सुरेश जाधव यांनी पोवाडा, गोंधळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

बातम्या आणखी आहेत...