आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापौगंडावस्था, प्रजनन आणि रजोनिवृत्तीचा काळ अशा तीन टप्प्यांमध्ये स्त्रियांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकस आहार, योगासने आणि पुरेसे पाणी प्यायले तरच आयुष्य निरोगी राहते. स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, असा सल्ला डॉ. आयेशा हाश्मी त्यांनी दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातर्फे महिला दिनानिमित्त ‘स्त्रियांचे आरोग्य आणि स्वच्छता, समस्या व आव्हाने’ या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
केंद्राच्या संचालक डॉ. मेहरुन्निसा पठाण अध्यक्षस्थानी होत्या. त्या म्हणाल्या, ‘पाळीच्या काळातील स्वच्छता महत्त्वाची आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. कॅन्सरच्या गाठी त्रासदायक नसल्यामुळे आपल्याला लवकर समजत नाही. स्तनांच्या गाठींची चाचपणी केली पाहिजे. वर्षातून एकदा तरी संपूर्ण तपासणी करावी.’डॉ. सविता बहिरट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्वर्णमाला म्हस्के यांनी आभार मानले. डॉ. अश्विनी मोरे, सतीश बोलकर, सूरज पवार यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.