आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेप:निवडणुकीतील आक्षेपांवर सुनावणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूक प्रक्रिया नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात पार पडल्या. त्यात कुलसचिवांच्या निर्णयांविरोधात कुलगुरूंकडे ४ अपिल दाखल झाले होते. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी घेतलेल्या सुनावणीत अर्जदारांनी आपलं म्हणणे मांडले. पुढील सुनावणी आता १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

विविध प्राधिकरणाच्या झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेतील निर्णयांवर किशोर हंबर्डे, राजकुमार म्हस्के यांच्या प्रत्येकी एक आणि संजय निंबाळकर यांनी दोन आक्षेप दाखल केले होते. त्यावर अर्जदार आणि गैर अर्जदारांची मंगळवारी कुलगुरू यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी निवडणूक विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. नॅकचा ग्राह्य धरण्यात आलेला कालावधी, कोटा ठरवण्याच्या पद्धती संबंधातील हे आक्षेप होते. निवडणुकी दरम्यान कुलसचिवांनी दिलेल्या निर्णयाविरोधात हे अपिल असून १७ फेब्रुवारीच्या सुनावणीनंतर या प्रकरणात कुलगुरूंचा निर्णय येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...