आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखी टीका-टिप्पणीसाठी 19 दिवस बाकी:जालना - नांदेड 194 किमी हायवेच्या आक्षेपांवर 23 सप्टेंबर रोजी सुनावणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड महामार्गाची पर्यावरणविषयक जाहीर लोकसुनावणी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात येत्या २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल.मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याच मार्गाला जालना ते नांदेड हा नवीन एक्स्प्रेस वे जोडला जाणार आहेे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत लेखी टीकाटिप्पणी सादर करावयाची असल्यास जाहीर सुनावणीच्या तारखेपूर्वी उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्लॉट नं. पी-३/१ व पी-३/२, अतिरीक्त एमआयडीसी फेज-२, जालना या पत्त्यावर अथवा srojalna@mpcb.gov.in, वेब- www.mpcb.gov.in वर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाप्रमाणेच मोबदला
समृद्धी महामार्गाच्या दरानुसार जालना-नांदेड महामार्गातील बाधितांना मोबदला मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील २९ गाव शिवारातून जाणाऱ्या या महामार्गाची लांबी सुमारे ६३ किलोमीटर आहे. १९४ किमी लांबीच्या एक्स्प्रेस वेसाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्चाकरिता मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीकडून याला मंजुरी मिळालेली आहे. शिवाय, नांदेडसोबतच परभणी, हिंगोली जिल्हेसुद्धा समृद्धी महामार्गासाठी जोडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूतोवाच केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...