आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:पाटोदा तालुक्यात जोरदार गारपीट अंब्यासह चिकु, लिंब फळबागांचे  नुकसान

बीड9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यात बुधवारी दुपारी साडेतीन नंतर अंमळनेर, कोतन, पिंपळवंडी, पांढरवाडी, उंडेवाडी, साबळेवाडी, मिसाळवाडी या गावात जोरदार गारपीट झाली असुन या गारपीटीमुळे पाडाला आलेल्या अंब्यासह फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर उन्हाळी हंगामातील तिळाचे नुकसान झाले असुन वाहली गावात गाराचा खच साचला होता.

पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, कोतन, पिंपळवंडी, पांढरवाडी, उंडेवाडी, साबळेवाडी, मिसाळवाडी या परिसरात बुधवारी दुपारी साडेतीन ते साडेपाच दरम्यान जोरदार पाऊस झाला. पावसात सुरूवातीपासुनच गारपीट सुरू होती. दुपारी साडेचार वाजता पुन्हा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असुन यामुळे शेतात पाडाला आलेल्या अंबा जमीनीवर पडून नुकसान झाले आहे. पेरूची पानेही गळाली आहेत. शेतात पेरलेले तीळ , गुरांसाठी पेरण्यात आलेली मका शेतातील मका आडवी झाली आहे. पांढरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने कडब्याच्या गंजीचे नुकसान झाले असुन कडबा भिजला आहे. कोतन येथे गारपीटीमुळे पाडाला आलेला अंबा जमीनीवर पडला आहे. परंतु उन्हाळी हंगामातील भुईमुगाला पाणी मिळाले आहे. या परिसरात बुधवारी सकाळी उन होते दुपारी बारा नंतर आकाशात ढगांची गर्दी झाली होती. दुपारी साडेतीन नंतर पावसाला सुरूवात झाली आहे.पाटोदा तालुक्यातील चिखली नाथ येथे बुधवारी जोरदार पाऊस झाला असुन शेतकरी बाबू लाड यांच्या घरा समोरील १५ वर्षांपूर्वी चे झाड मोडून पडले तर गारांचा थर जमा झाला होता. चिकुंच्या बागासह काही ठिकाणी लिंबाचेही नुकसान झाले असुन कोरोनाच्या संकटामुळे अगोदरच सर्वच क्षेत्रांच मोठे नुकसान झाले असताना त्यातच आता हा अवकाळीचा फटका बसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...