आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:आठ दिवसांच्या खंडानंतर मुसळधार पाऊस; हर्सूलमध्ये 73 मिमी

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री जोरदार कमबॅक केले. दुपारपर्यंत ऊन तळपळे होते, पण सायंकाळी ४ नंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली. रात्री ११.३० नंतर मात्र रौद्ररूप धारण केले. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४.६ मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक ७३ मिमी म्हणजे अतिवृष्टीची नोंद हर्सूल मंडळात झाली. गुरुवारीही अधूनमधून सरी कोसळल्या.

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर रात्री ११.३० पर्यंत ४७.५ मिमीची नोंद एमजीएम वेधशाळेने घेतली आहे. शुक्रवारीही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

बुधवारी मध्यरात्रीचा पाऊस
हर्सूल ७३ मिमी, पिंपळवाडी ७२.५, बिडकीन ७१.५, पैठण ९५.८, लासूरगाव ९५.८, महालगाव ८०.८, लाडगाव ८८.८, वासरानी ७९.८, विष्णुपुरी ६८, वाजेगाव ६८.८ मिमी, उस्मानपुरा १५.३, भावसिंगपुरा ३५, चिकलठाणा २१.३, चित्तेपिंपळगाव ०.३, लाडसावंगी ७.३, हर्सूल ७३.०, करमाड १०, चौका येथे २.३ मिमी पाऊस पडला.

बातम्या आणखी आहेत...