आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:सलग दुसऱ्या दिवशी धुवाधार पाऊस;  सव्वा तासात शहरात 40 मिमीची नाेंद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील पंधरा दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी जाेरदार हजेरी लावली. दुपारी तीन वाजेनंतर ढग दाटून आले. सायंकाळी ५.१० ते ६.३० दरम्यान धुवाधार पाऊस झाला. एमजीएम विद्यापीठाच्या वेधशाळेत ४०.६ मिमी, तर गांधेली वेधशाळेत २१.३ मिमी पाऊस झाल्याची नाेंद आहे. एेन आरतीच्या वेळी पाऊस आल्याने अनेक गणेश मंडळांची धावपळ उडाली.

बुधवारी झालेल्या पावसामुळे वातावरणातील धूलिकण कमी झाले. परिणामी सकाळी सूर्यावरून येणाऱ्या अतिनील किरणांचे वातावरणातील प्रमाण वाढत गेले. सकाळी ९ वाजता अतिनील स्थिरांक १.७ होता. तो वाढत जाऊन दुपारी १२ वाजता ५.७ पर्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला. यामुळे उन्हाच्या संपर्कात आल्यावर अंगाला चटके बसत होते. सायंकाळी चारनंतर ढग दाटून येऊन पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजता ३७ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. सहा वाजता यात आणखी वाढ होऊन वाऱ्याचा वेग ३८.६ किमी झाला. विजांच्या कडकडाटासह शहरात जाेरदार पाऊस सुरू झाला. दीड ते दाेन तासांच्या पावसामुळे शहरातील औरंगपुरा, सिडको, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, जटवाडा रोडसह ४० पेक्षा अधिक भागातील वसाहतीत पाणी साचले. रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली.

छावणीतील मोरया हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका छोट्या घरात पाणी शिरले होते. हे पाणी काढण्यासाठी अग्निशमनच्या जवानांना बोलावण्यात आले. याशिवाय शहरात कुठेही माेठे नुकसान झाल्याची नोंद रात्री साडेआठ वाजेपर्यंत अग्निशमन विभागाकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. मनपा मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाहन काढण्यासाठी खूप वेळ ताटकळत उभे राहावे लागले.

बातम्या आणखी आहेत...