आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे थैमान:औरंगाबादेत रात्रभर मेघगर्जनेसह तुफान पाऊस, जायकवाडी धरणाचे आपत्कालीन 9 दरवाजे पुन्हा उघडले; 90 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू..!

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादच्या नारेगाव परिसरातील मुख्य रस्ता रात्रभर झालेल्या तुफान पावसानंतर असा बनला.
  • मराठवाड्यात यंदा पाणीच पाणी !

औरंगाबाद शहराला रात्री मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मेघगर्जनेसह पडत असलेल्या या तुफान पावसामुळे वसाहती जलमय झाल्या आहेत. तर औरंगाबादमध्ये आज शनिवारी दुपारच्या सुमारसही पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद शहरामध्ये 25 मिनिटांमध्ये 52 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळेत पडलेल्या या पावसामुळे सुखना नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. हे पाणी गावांमध्य शिरले आहे. या तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

रात्रभर मुसळधार पावसाने चिकलठाणा परिसरातील स्वयंभू प्राथमिक शाळेला असे तलावाचे स्वरुप आले होते. पाहा व्हिडिओ...

9 दरवाजे पुन्हा उघडले

जायकवाडी धरणाचे आपत्कालीन 9 दरवाजे पुन्हा उघडले आहेत. यामधून 90 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गेट क्र. 1 ते 9 असे एकुण 9 गेटस 0 फुटावरुन 1.5 फुट उंचीवर उघडले आहेत. अशाप्रकारे 14148 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढवुन 89604 क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे.

1) 4 फुट उंचीने उघडण्यात आलेल्या गेटचे क्रमांक :- 10 ते 27 असे एकुण 18 गेट

2) 1.5 फुट उंचीने उघडण्यात येणाऱ्या गेटचे क्रमांक :- 1 ते 9 असे एकुण 9 आपात्कालीन गेट

मराठवाड्यात यंदा पाणीच पाणी !
नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यात 679 मिमी सरासरी असताना 1 जून ते 30 सप्टेंबरअखेर 1020 मिमी म्हणजे तब्बल 150 टक्के पाऊस झाला. बीडसारख्या दुष्काळी भागात सरासरीच्या 175 टक्के पाऊस बरसला. मराठवाड्यात 53 तालुक्यांत एक हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अवर्षणप्रवण तालुक्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला. मराठवाड्यातील सर्व 11 धरणे भरली असून जवळपास 30 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...