आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे जोरदार पुनरागमन:औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, शेतातील माती वाहून गेल्याने पिकांचे नुकसान

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांच्या उघडीपनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. आज शहरात अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्या. बुधवारी मध्यरात्री हर्सूल मंडळात ७३ मिमी म्हणजे अतिवृष्टी झाली. तर, उर्वरित आठ मंडळात अत्यल्प ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेध शाळेने केली आहे. सायंकाळी सात वाजेनंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली होती.

मेघगर्जनेसह पाऊस

गत तीन दिवस सूर्य चांगला तळपला. यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले. मंगळवारी शहरात तुरळक ठिकाणीच टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडला. तर बुधवारी दिवसभर सूर्य तळपला. मध्यरात्री मेघ गर्जनेसह पाऊस पडला. मात्र, पावसाच्या वितरणात कमालीचा फरक राहिला आहे. त्यानुसार औरंगाबाद २७.८ मिमी, उस्मानपुरा १५.३, भावसिंगपुरा ३५, चिकलठाणा २१.३,चित्तेपिंपळगाव ०.३ मिमी, लाड सावंगी ७.३ मिमी आणि हर्सूल मंडळात ७३ मिमी अतिवृष्टी तर करमाड १०, चौका २.३ मिमी पाऊस पडला.

या मंडळात अतिवृष्टी

हर्सूल ७३ मिमी, पिंपळवाडी ७२.५, बीडकीन ७१.५, पैठण हर्सूल ९५.८, लासुरगाव ९५.८, महालगाव ८०.८, लाडगाव ८८.८, बदनापुर १०३.५, रांजनी १३७.३, मंगरूळ ६९.३, तुपा ६५.८, वासरानी ७९.८, विष्णूपुरी ६८, वाजेगाव ६८.८ मिमी अतिवृष्टी झाली असून पिकांचे आणि शेती व माती वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...