आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे गहू हरभरा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आंब्याला देखील फटका बसला आहे. मराठवाड्यात विभागात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सरासरी 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे औरंगाबाद मध्ये काल संध्याकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता ढगाळ वातावरण दिवसभर पाहायला मिळाले होते तर रात्री आठ नंतर पावसाला सुरुवात देखील झाली होती.तर मंगळवारी सकाळी पाच त सातच्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला.
असा झाला पाऊस
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8.5 मिमी पाऊस झाला आहे. तर पैठण तालुक्यात 4.8 मिमी पाऊस झाला आहे. गंगापूर 10.8मिमी वैजापूर 8.3 मिमी कन्नड 6.3 मिमी खुलताबाद8.1मिमी सिल्लोड 3.7 मिमी सोयगाव4 फुलंब्री 5.7 मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6.9 इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हरभरा गहू या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे शेतामध्ये अनेक ठिकाणी गहू आडवे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विभागात 2.2 मिमी पावसाची नोंद
तर जालना जिल्ह्यात भोकरदन जाफराबाद तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे भोकरदन तालुक्यात सर्वाधिक 12.5 मिमी जाफराबाद तालुक्यातही 12 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जालना मध्ये चार मिलिमीटर आणि अंबडमध्ये तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर परतुर तालुक्यात तीन किलोमीटर आणि बदनापूर तालुक्यात 10.9 पावसाची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर हिंगोली जिल्ह्यात 1.7 मिमी इतका पाऊस झाला आहे तर मराठवाड्यात विभागात 2.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.