आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात 182 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 20 लाख हेक्टरचे नुकसान झाले असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 61 मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 90 पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. बीड 65 लातूर 66 उस्मानाबाद 57 जालना 47 औरंगाबाद 41 मिमी परभणी 44 आणि हिंगोली त 65 मिमी पाऊस झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात 65 मंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात जोरदार पाऊस सूरु आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या 65मंडळात तर औरंगाबाद 10 जालना 13 बीड 29 लातूर 30 उस्मानाबाद 12 परभणी 06 हिंगोली 17 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात अनेक रस्त्यांची वाहतूक बंद आहे
नद्यांना आले पूर
औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचा ग्रामीण भागाला फटका बसला आहे. सोयगाव तालुक्यातील बनोटी, निंबायती, निंभोरा, सावळदबारा , तित्तूर गावात घरांची पडझड आहे. विशेषत निंबायती गावात काही घरांमध्ये पूराचे पाणी शिरले होते. वरठाण, बनोटि, निंबायती येथे नदीला अद्याप पूराचे पाणी आहे.
जोरदार पावसामुळे घराची भिंत पडली
सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरात रात्रीपासून ते सकाळ पर्यंत जोरदार पाऊस सुरुच आहे. ढगांच्या गडगडाट व वीजेच्या कडकडाटासह जोरदार व दमदार, पाऊस पडत आहे. चोहीकडे पाणीच पाणी झाले आहे.
धानोरा ते पूर्णवाडी बेलेश्वर वाडी काकडेवाडी येथील पुर्ण नदीला पुर आल्याने गावचा संपर्क तुटला आहे. पळासखेडा येथे 3 घरांची पडझड झाली आहे. ठाणा येथे 1 घराची भिंत पडली आहे
व्हिडिओमध्ये दिसणारे दृष्य फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील आहेत. गावातील दुकान पुराच्या पाण्यात गेल्या वाहून
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.