आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 दिवसात मराठवाड्यातील 3 जिल्ह्यात जास्त पाऊस:3 जिल्ह्यात सरासरी पेक्षा 85.7 ते 36 टक्के कमी पर्जन्यमान

संतोष देशमुख। औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी म्हणजे 129.5 टक्के पर्जन्यमान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यांत 202, जालना 225 आणि उस्मानाबादेत 207.4 टक्के तर नांदेडमध्ये केवळ 14.3, परभणी 38.5 आणि हिंगोली 64 टक्केच पाऊस पडला. येथे 85.7ते 36 टक्के पावसाची तूट राहिली.

असा झाला पाऊस

जून मध्ये सरासरी इतका तर जुलैमध्ये एकशेचौपन्न टक्क्यांवर पर्जन्यामन झाले. ऑगस्टमध्ये पावसाचा पंधरा दिवसांचा मोठा खंड पडला होता. 31 ऑगस्टपासून गणपती बाप्पासोबत पावसाचेही वादळी वारे, मेघ गर्जनेसह पुनरागमन झाले आहे. मात्र, जेथे सापेक्ष आर्द्रता 100 टक्के, बाष्पयुक्त ढगांची गर्दी, अनुकूल तापमान आणि कमी हवेचा दाब असतो तेथेच काही वेळेतच धो धो पाऊस पडतोय. त्यानुसार 31 ऑगस्ट रात्री ते 1 सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत माजलगाव, अंबाजोगाई, धारूर, शिरूर कासार तालुक्यात 30 ते 48 मिमी, लातुर 33, परंडा 35, औरंगाबादेत 13.5 मिमी पाऊस पडला. 2 सप्टेंबर रोजी औरंगाबाद तालुक्यात 42.9 मिमी, खुलताबाद 31, भोकरदन तालुक्यात 55.7, जाफराबाद 32, लातूर 43.9 व औसा 39.9 मिमी, तर नांदेडच्या 16, परभणी 9 व हिंगोली 5 तालुक्यांत पावसाचा केवळ शिडकावा झाला. 4 सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत खुलताबादेत 43.9 मिमी, अहेमदपुर 50 मिमी तर किनवट 36.5, माहुर तालुक्यात 31 मिमी सर्वाधिक पाऊस झाला. विशेष म्हणजे वैजापुर तालुक्यातील काही मंडळात गारपीटीची नोंद झाली.

नुकसानीची अचुक नोंद व त्यानुसार भरपाई मिळायला हवी

हवामान बदलामुळे पावसाच्या वितरणात कमालीचा फरक राहात आहे. कुठे धो धो पाऊस पडतोय तर कुठे पावसाचा थेंबही पडत नाही. तर काही ठिकाणी अल्प पाऊस पडतो आहे. जास्त पाऊस एकुण सरासरी पावसाची टक्केवारीत वाढ करत आहे. त्यामुळे जास्त पावसाचे मंडळे, तालुके, पावसाची तुट पडलेल्या मंडळे व तालुक्यांची नोंद घेऊन नुकसानची पातळी मोजणे नितांत गरजेचे आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळायला हवी.

1 ते 4 सप्टेंबर मधील पावसाचा आलेख

जिल्हा अपेक्षित प्रत्यक्षात टक्केवारी

औरंगाबाद - १५.१ ३०.४ २०२

जालना - १४.२ ३१.९ २२५

बीड - १७.२ ३०.९ १७९.७

लातूर - १८.१ २९.० १६०.९

उस्मानाबाद - १८.५ ३८.३ २०७.४

नांदेड - १६.७ २.४ १४.३

परभणी - १६.९ ६.५ ३८.५

हिंगोली - १५.५ ९.९ ६४.०

एकूण १६.६ २१.५ १२९.५

बातम्या आणखी आहेत...