आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान, कन्नडमधील तरुण शेतकऱ्याने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावातील हा शेतकरी होता.

राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावखेड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे. आधीच कोरोना परिस्थितीमुळे हैराण असलेला शेतकरी त्याच अतिवृष्टीने हिरावलेले पीक असे दुहेरी संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंघावत आहे. याच विवंचनेतून कन्नडमधील शेतकऱ्याने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्याच्या शेतीचं प्रचंड नुकसान झाले आणि तरुणाने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावातील हा शेतकरी होता. या तरुण शेतकऱ्याचे नाव सुरेश रावसाहेब जंजाळ असे आहे. 37 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान पाहून या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.