आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड तालुक्यातील आठही मंडळात मुसळधार पाऊस झाल्याने मंगळवारी रात्री 10 वाजता शिवना टाकळी प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला. दरवाजे क्रमांक 1,3,4 हे तीन दरवाजे प्रत्येकी एक फुटाने उचल्याने 3 हजार 240 क्युसेक्स पाणी शिवना नदी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
शिवना टाकळी सांडवा विसर्ग होत असल्याने नदीने रात्रीपासुनच धोक्याची पातळी ओलांडली आहे. या शिवना नदीच्या काठच्या टाकळी, लव्हाळी, वैसपुर, बोरसर लामणगाव या गावांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवना नदीकाठच्या शेतक-याच्या शेती व पिकांचे अंतोनात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील जळगाव घाट येथील जैतापूर रस्त्यावरील पूल पावसामुळे वाहून गेल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. चापानेर मंडळात 150 मिलीमीटर पाऊस पडल्याने चिवळी येथे पाझर तलाव फुटला तर चापानेर कडून सोमेश्वरवाडी, बोलटेक जाणाऱ्या रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेल्याने शेतीमलासह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. कंळकी येथील गायमुख धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असुन धरणाच्या भिंतीवरुन पाणी वाहु लागल्याने धरण फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण्याची सांड मोकळी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.