आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अतिवृष्टी:धो-धो पावसाने औरंगाबादेत दाणादाण; तीन तासांत 81 मिमी पावसाची नोंद, अनेक घरांत शिरले पाणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजीनगर भागातील एका सलूनमधून पाणी उपसताना कारागीर. छाया : रवी खंडाळकर
  • राज्यात गुरुवारी मराठवाड्यासह खान्देश, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला

औरंगाबाद शहरास गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने झाेडपून काढले. सुरुवातीच्या टप्प्यात पावसाचा वेग जाेरदार हाेता. नंतर रात्री उशिरापर्यंत कमीअधिक प्रमाणात सरी काेसळत हाेत्या. रात्री ११.३० वाजेपर्यंतच्या तीन तासांत ८१ मिमी पावसाची नाेंद झाली. या अतिवृष्टीमुळे सखल भागातील अनेक घरे-दुकानांमध्ये पाणी शिरले. काही इमारतींच्या संरक्षक भिंती काेसळल्या. वीजपुरवठाही काही वेळ खंडित झाला हाेता.

> अर्ध्या तासात ७१ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. या महिन्यात प्रथमच इतका दमदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले हाेते. 

> राज्यात गुरुवारी मराठवाड्यासह खान्देश, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला

> पुणे वेधशाळेनुसार २५ जुलैपर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता.