आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस:पूल वाहून गेल्याने कानडगावचा संपर्क तुटला, शेतांना तलावाचे स्वरूप, बळीराजा चिंतेत

प्रतिनिधी। कन्नड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील औराळा, जेहुर परिसरात आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कानडगाव-विटा रोडवरील नुकताच बांधलेला पुल वाहून गेल्याने रस्ता बंद झाला. त्यामुळे कानडगाव येथील नागरिकाचा संपर्क तुटला आहे. आज मुसळधार पावसाने वादळी वा-यासह जोरदार बँटीग केल्याने विटा येथील रंजना गुलाब शिंदे यांचे पत्र्याचे घर पडले. सुदैवाने कुठली जीवितहानी झाली.

पावसामुळे पिके पाण्यात गेली आहेत.
पावसामुळे पिके पाण्यात गेली आहेत.

शेतीचे नुकसान

औराळा, जेहुर परिसरात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र, आज औराळा भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचे स्वरुप आले होते. शेतात पाणी गेल्यामुळे कपाशी, मका खरडुन गेली व काही मका आडवी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...