आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊस:हिंगोली शहरासह जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस, सेनगाव तालुक्यातील पूल वाहून गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला 

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे सेनगाव तालुक्यातील आजेगाव जवळील रस्त्याचा पूल वाहून गेला. यामुळे परिसरातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. तर गावकऱ्यांची वाहतुकीसाठी मोठी अडचण होऊ लागली आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये कनेरगाव नाका ते जिंतूर या महामार्गाचे काम सुरू आहे गोरेगाव सेनगाव मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर आजेगाव शहरामध्ये पुलाचे बांधकाम केले जात आहे. यासाठी याठिकाणी वळण रस्ता काढण्यात आला आहे. मात्र गेल्या २४ तासात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याचा नळकांडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे परिसरातील आठ गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना या पाण्यातूनच वाहतूक करावी लागत आहे. दरम्यान पुल वाहून जाण्याची जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी कळमनुरी तालुक्यातील सांडस -सालेगाव मार्गावरील पूल वाहून गेला तर दोन दिवसांपूर्वीच औंढा तालुक्यातील वसई येथील पूल वाहून गेला आहे. त्यानंतर आता ही तिसरी घटना आहे.

दरम्यान हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील चोवीस तासांमध्ये १७.५४  मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात काही प्रमूख मंडळ निहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे हिंगोली १४ मिलिमीटर, खांबाळा ८,माळहिवरा ६,सिरसम ३, बासंबा ७, नरसी नामदेव ९, डिग्रस १४, कळमनुरी १९, आखाडा बाळापुर २६, डोंगरकडा १२, वारंगा फाटा १०, वाकोडी २६, सेनगाव ३०,  गोरेगाव ९, आजेगांव ५५, साखरा ९९, पानकनेरगाव ४४, हत्ता ८, गिरगाव १५, कुरुंदा १०, हयातनगर २९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

दरम्यान हिंगोली तालुक्यात ता. १ जून पासून  आतापर्यंत एकूण १९१ मिलिमीटर पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यात १५४, सेनगाव २३६, वसमत १४९, औंढा तालुक्यात २५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...