आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव:कन्नड घाटातील अवजड वाहतूक बंद; आजपासून 27 नोव्हेंबरपर्यंत केवळ दुचाकी, कारला मुभा

चाळीसगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कन्नड घाटात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बुधवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेपासून ते दि. २७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे. घाट सतत जाम हाेत असल्याने अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, असे पत्र महामार्ग पोलिस केंद्र, ग्रामीण पाेलिस व कंत्राटदार मे. संत सतरामदास प्रा. लि. यांनी महामार्ग प्राधिकरणाला दिले होते. त्यानुसार घाटातील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कार आणि दुचाकी ही वाहने घाटातून जाऊ शकतील, अशी माहिती प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी दिली.

औरंगाबादहून येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवली
घाटातील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक त्यात औरंगाबादकडून धुळ्याकडे येणारी व जाणारी अवजड वाहने औरंगाबाद-देवगाव-रंगारी- शिऊर बंगला-नांदगाव-मालेगावमार्गे धुळ्याकडे वळवण्यात आली आहेत. औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणारी व जाणारी वाहतूक ही औरंगाबाद-देवगाव-रंगारी-शिऊर बंगला-नांदगावमार्गे वळवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...