आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:'हॅलो मी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलतोय, धोका अजून टळलेला नाही याची जाणीव ठेवा', फेसबुक लाईव्ह वरून संवाद

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅलो, मी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलतोय, कोरोनाच्या परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही, मात्र धोका अजूनही टळलेला नाही याची जाणीव ठेवा. जनतेनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी मंगळवार (ता. १५) जिल्हावासीयांशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरूना च्या पार्श्वभूमीवर यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. हिंगोली जिल्ह्यांमध्ये सध्या कोणाचे २२८ रुग्ण असले तरी त्यापैकी १९२ रुग्ण बरे झाले आहेत सध्याच्या स्थितीमध्ये उ६ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. या रुग्णांची आरोग्य विभागाकडून योग्य काळजी घेतली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या गंभीर रुग्णावर हिंगोली येथेच उपचार व्हावे  यासाठी अवघ्या एका महिन्यात कोवीड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अति गंभीर असलेल्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जाणार असून त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णांना मोठ्या शहरात पाठवण्याची गरज भासणार नाही. या रुग्णालयांमध्ये एकाच वेळी १००रूग्णांवर उपचार करता येणार असून २३ व्हेंटिलेटर आहेत. तसेच पल्स ऑक्सीमीटर व सेंटर ऑक्सिजन देखील उपलब्ध आहे. प्रत्येक बेडसाठी ऑक्सिजन ची व्यवस्था करण्यात आली आहे.  एका महिन्यामध्ये शून्यातून हे रुग्णालय उभारण्यात आले आहे या रुग्णाला मुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट झाली आहे.

दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी असली तरी प्रत्येक नागरिकाने काळजी घेण्याची गरज आहे. मात्र अद्यापही नागरिकांमधून या आजाराबाबत जबाबदारीची जाणिव नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये याबाबतच्या स्पष्ट सूचना दिली असतानाही नागरिक गर्दी करत आहेत. बँक, आठवडी बाजार तसेच इतर ठिकाणीही  गर्दी होऊ लागली आहे.  अद्यापही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची जाणीव नागरिकांनी ठेवावी.  जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनावर पूर्णपणे विश्वास ठेवावा प्रशासनाकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत घेतली जातील. प्रशासनाच्या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहनही जयवंशी यांनी केली आहे.

0