आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:हेल्मेट वापरणाऱ्यांचा सत्कार; पोलिसांचा शहरात उपक्रम, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या संकल्पनेतून मोहीम

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचा वाहतूक पोलिसांनी सोमवारी सन्मान केला. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या संकल्पनेतून हेल्मेट वापरणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

शहर वाहतूक शाखा आणि क्रेडाई यांनी हेल्मेटचा वापरणाऱ्या दुचाकीस्वारांचा दर सोमवारी सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतूक विभागातर्फे ३०० ते ३५० हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांचे विविध चौकांत फोटो काढले. त्यातून १० फोटो सोडत पद्धतीने निवडून त्यांचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात महेंद्र आनंद खरात, बाबासाहेब नागरे, महेश प्रल्हादराव दोरवट, विशाल आनंद वायकोस, नंदा थोरात, रवींद्र क्षीरसागर, बाळू तुकाराम पगडे, संताराम सवाईराम महेर, विद्या संजय कुट्टे, विश्वनाथ भुजंगराव नंदाणे आदींचा समावेश होता.या वेळी या दुचाकीस्वारांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...