आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत दिली जावी : विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ-मराठवाड्यासह राज्‍यातील अतिवृष्‍टीग्रस्‍त शेतकरी आणि नागरिकांना तत्काळ दिलासा द्या, अशी मागणी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या शिष्‍टमंडळाने राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी (२ ऑगस्ट) भेट घेऊन केली.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी ७५ हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्‍वाखालील शिष्‍टमंडळात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे आदींचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...