आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:एकदा काेराेना झाल्यानंतर इम्युनिटी वाढण्यास मदत; 4 शाेधांद्वारे दावा, काेविड-19 मध्येही हे शक्य

Aurangabadएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दोन दशकांत कोरोना परिवारातील ३ विषाणू ठरले मानवजातीसाठी प्रचंड घातक
  • ‘काेराेना व्हायरस’ कुटुंबातील इतर विषाणूंवरील संशाेधनाचा निष्कर्ष

काेराेना हा विषाणूचा परिवार आहे. त्यात सामान्यपणे साैम्य ते मध्यम पातळीवरील श्वसनासंबंधीचे आजार हाेतात. न्यूमाेनिया, सर्दी इत्यादीचा त्यात समावेश हाेताे. वास्तविक गेल्या दाेन दशकांत याच परिवारातील तीन विषाणू मानवजातीसाठी प्राणघातक ठरले आहेत. सार्स, मार्स, काेविड-१९. यात काेविड-१९ चा अपवाद वगळता इतर विषाणूसंबंधी आजाराविषयी मानवी राेग प्रतिकारशक्तीच्या व्यवस्थेबाबतची संशाेधने उपलब्ध आहेत. त्यावरून एकदा काेराेना झाल्यानंतर माणसात काही वर्षांसाठी त्याबद्दलची इम्युनिटी विकसित हाेते, असा निष्कर्ष काढला जाताे. हीच गाेष्ट काेविड-१९ च्या बाबतही घडू शकते, असा संशाेधकांचा अंदाज आहे.  

‘कोरोना विषाणू’ परिवारातील इतर विषाणूवरील संशोधनाबाबत निष्कर्ष

  • हार्वर्ड रुग्णालयातील संशाेधकांनी १८ स्वयंसेवकांना १९७७ मध्ये काेराेना विषाणूचे इन्फेक्शन दिले. एक वर्षानंतर त्यांना प्रयाेगाच्या पातळीवर पुन्हा बाधित करण्यात आले. परंतु, राेग प्रतिकारशक्तीमुळे त्यांच्यापैकी काेणालाही संसर्ग हाेऊ शकला नाही. परंतु, नंतर पुन्हा १२ स्वयंसेवकांवर काेराेनाचे थाेड्या वेगळ्या पद्धतीने बाधित करण्यात आले. परंतु, त्यांच्यातही अंशत: संसर्ग कायम हाेता, असे दिसून आले.
  • इपिडिमाेलाॅजी मेडिकल जर्नलमध्ये १९९० मध्ये प्रकाशित एका संशाेधनानुसार १५ स्वयंसेवकांना बाधित करण्यात आले. त्यापैकी दहा जण बाधित झाले. एक वर्षानंतर त्यापैकी १४ जणांना पुन्हा बाधित करण्यात आले. परंतु, त्यांच्यावर संसर्गाचे प्रमाण फार कमी दिसले.
  • सार्स व मार्ससंबंधी झालेल्या एका अभ्यासात बाधित लाेकांच्या रक्तात दाेन ते तीन वर्षांपर्यंत अँटीबाॅडी अस्तित्वात राहिल्या. या सर्व अभ्यासाच्या आधारे काेविड-१९ रुग्णांतही त्यामुळे संसर्गानंतर या राेगाविषयीची प्रतिकारशक्ती आणखी वाढू शकते, असा दावा आहे. म्हणजेच त्यांना पुन्हा संसर्गाची शक्यता कमी हाेईल.
  • अलीकडेच नेदरलँडमध्ये इरास्मस विद्यापीठातील तज्ञांनी देखील एक संशाेधन करून या दाव्याला पुष्टी दिली. त्यानुसार सार्स-काेव-२ च्या १२ बाधितांमध्ये या आजारासंबंधी अँटिबाॅडी विकसित झाल्याचे दिसून आले.
बातम्या आणखी आहेत...