आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा स्थळ हा आपला सुवर्ण इतिहास:तो वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची, डॉ. चावले यांचे प्रतिपादन

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारसा स्थळ हा आपला सुवर्ण इतिहास आहे. तो वाचवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. मात्र , धर्माच्या नावावर अनेकजण वारसा स्थळ नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच जागे व्हा. अन्यथा वारसस्थळ दृष्टीआड जातील. जगातील वारसा स्थळ असलेले स्थळाचा दर्जा धोक्यात येऊ शकतो, अशी भीती पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद सर्कलचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ मीलनकुमार चावले यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त आणि जागतिक वारसा सप्ताहानिमित्त औरंगाबाद केंद्राच्या वतीने 'पुरातत्व स्मारके आणि स्थळे-व्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

जे.एन.ई.सी. महाविद्यालयातील आर्यभट्ट सभागृहमधे झालेल्या या कार्यक्रमात चव्हाण सेंटरच्या औरंगाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम उपस्थित होते.यावेळी प्राचार्य प्रतापराव बोराडे, सचिव निलेश राऊत उपस्थित होते. चावले यांनी पुरातत्व स्थळे व स्मारकांच्या प्रश्नांवर त्यांनी उहापोह केला.

यांचे लाभले सहकार्य

वारसा स्थळांचा होणारा रहास याकडे त्यांनी लक्ष वेधले. पत्रकार आदित्य वाघमारे यांनी सूत्र संचालन केले. 'अमेझिंग औरंगाबाद ग्रूप' चे अ‍ॅड. स्वप्नील जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठ, 'अमेझिंग औरंगाबाद ग्रूप' व औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

वेरुळच्या तक्रारी वाढल्याने दर्जा जाण्याची भिती

लेणी परिसरात विक्रेते येणे, कचरा टाकणे, लेण्यांमध्ये फुल वाहणे, दिवा लावणे या गोष्टी सातत्याने घडत आहेत. आम्ही त्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करत असतानाही या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे घटना वाढत गेल्या तर जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढून घेतला जाईल.

वारसा स्थळ आपला ठेवा म्हणून जपा

प्रत्येक वारसास्थळ हा आपला अमुल्य ठेवा आहे. तो जपण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहीजे. तरुणपिढीने याविषयी संवेदनशील झाले पाहीजे, असे आवाहन अंकूशराव कदम यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...