आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्वाची बातमी:हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र उद्या बंद राहणार, दिल्लीगेट जलकुंभावरील पाणीपुरवठा होणार विस्कळीत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पाणीपुरवठा सुरळीत व चारदिवसाआड करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील आहे. जटवाडा हर्सूल तलाव येथून जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत 350 मीमी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकली जात आहे. या वाहिनीवर क्रॉस कनेक्शन टाकण्यासाठी शनिवारी (ता. 4) हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीगेट जलकुंभावरील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने हर्सूल तलावातून पाचऐवजी दहा एमएलडी पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी हर्सूल तलावलगतच्या जटवाडा रोडपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र 350 मीमी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या जलवाहिनीवर क्रॉस कनेक्शन टाकण्यासाठी शनिवारी एक दिवसाचा शटडाऊन घेतला जात आहे.

या काळात हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीगेट जलकुंभाला दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी, या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. नागरिकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त करत सहकार्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...