आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणूस जन्मभर विद्यार्थी असतो असं म्हणतात ते खोटं नाही. याचे प्रत्यक्ष उदाहरण मंगळवारी पाहायला मिळालं. 56 वर्षीय आजीबाईने आपल्या नातवासोबत दहावीची परीक्षा दिली. पतीची साथ, अन् जिद्दीच्या जोरावर हे शक्य होत असल्याची प्रतिक्रीया हर्सूल येथील शेख हजराबी शेख गनी यांनी दिली.
पेपर संपल्यानंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्या म्हणाल्या ‘माझं लग्न लवकर झालं. घरची परिस्थिती खूप बेताचीच होती. पण मला शिक्षणाची खूप आवड. लग्नानंतर माझ्या पतीने मला साथ दिली. ते ड्रायव्हर होते. पण हल्ली तब्येत बरी नसल्याने घरी असतात. आज परीक्षा केंद्रावर मला सोडवण्यासाठी आले होते. त्यांनी साथ दिली म्हणून लग्नानंतर चौथीला प्रवेश घेतला. आता दहावीची परीक्षा देते आहे. मला तीन मुले, एक मुलगी आहे. सर्वांची लग्नं झालीत. माझे नातू आता दहावीला आहेत. त्यांच्यासोबत मी पण अभ्यास करते. सर्वांची मदत शिक्षणात होते. आता लिहिता-वाचता येतं. शिक्षणाच्या आवडीमुळे हे शक्य झाले,’ असे हजराबी सांगतात.
१७ नंबर फॉर्म भरून शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले : आरती नाईक
२७ वर्षीय आरती नाईक यांचे शिक्षण पाचवीनंतर थांबले होते. गल्लीत जेव्हा सर्वेक्षणासाठी काही ताई आल्या, त्या वेळी समजले की, १७ नंबरचा अर्ज भरून मला
पुन्हा शाळेत जाता येईल. राहिलेलं शिक्षण पूर्ण करता येईल. घरच्यांचाही पाठिंबा मिळाला. घरात मी आणि पती, सासूबाई. मला पुढे कॉम्प्युटर शिकायचे आहे.
आपल्याला पुन्हा शिकण्याची संधी मिळाल्याचा आनंद तर होताच; पण आज मी दहावीची परीक्षा देत आहे याचाही खूप आनंद झाला. नियमित शाळेतही येत होते, असे
आरती नाईक यांनी सांगितले.
पतीच्या निधनानंतर नाेकरी मिळेना म्हणून शिकायचं ठरवलं : अर्चना
खोकडपुरा येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय अर्चना जावळे यांनीही दहावीची परीक्षा दिली. त्या म्हणतात, ‘नववीपर्यंतच शिक्षण झालं होत. पण मागील वर्षी पतीचे निधन
झाले. सध्या मी आई-वडिलांजवळ राहते आहे. मला दोन मुलं आहेत. एक सातवीच्या वर्गात आणि एक नववीच्या वर्गात शिकतो आहे. त्यांना शिकून मोठं करायचं
आहे. पण त्यासाठी मला आधी आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. पतीच्या निधनानंतर जिथेही कामासाठी प्रयत्न केले, तिथे शिक्षण विचारले जाई. त्या वेळी ठरवलं, आता
पुन्हा शिकायचं. सध्या एका खासगी दुकानात काम करतेय. मुलांना शिकून खूप मोठं करायचं आहे. त्यासाठी मीदेखील आता माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार अ
ाहे. प्रौढ शाळेत आमची चांगली तयारी करून घेतली जाते. नववीत शिकणारा माझा मुलगा मदत करतो, असे त्या म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.