आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार चषक:आज हायटेक, एमआयटी जेतेपदासाठी भिडणार ; प्रदीप जगदाळेने झळकावले स्पर्धेचे पहिले शतक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयोजित आयजे क्रीडा महोत्सवांतर्गत खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत आज ७ नोव्हेंबर रोजी फायनलमध्ये हायटेक इन्फ्रा स्ट्रायकर्स समाेर एमआयटी क्युस्ट एक्सलन्स संघाचे आव्हान असेल. पहिल्या उपांत्य लढतीत हायटेक इन्फ्रा स्ट्रायकर्सने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. रविवारी आमखास मैदानावर झालेल्या लढतीत हायटेकने एम्पायर स्टेट संघावर ६१ धावांनी मात केली. शतकवीर प्रदीप जगदाळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हायटेकने २० षटकांत २ गडी गमावत १९६ धावांचा डोंगर उभारला. संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार प्रदीप जगदाळेने स्पर्धेतील पहिले शतक ठोकले. प्रदीपने ६५ चेंडूंत ६ चौकार व ८ उत्तुंग षटकार खेचत नाबाद ११४ धावांची खेळी करत. मो. आमेरने अर्धशतक झळकावले. प्रदीप व आमेर जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ११६ चेंडूंत १८१ धावांची दीडशतकी भागीदारी रचली. आमेरने ५१ चेंडूंत ७ चौकार खेचत ५९ धावा ठोकल्या. सय्यद तल्लाहने १ बळी घेतला.

प्रत्युत्तरात एम्पायर स्टेट संघाचा डाव १८.४ षटकांत १३५ धावांवर संपुष्टात आला. ग्रामीण पोलिसचा खेळाडू असलेल्या फिरकीपटू विकास नगरकरने ३ बळी घेत एम्पायरच्या फलंदाजांवर लगाम लावली. कर्णधार शेख मुकिमने ३०, सय्यद फरहानने १४, ऋषिकेश पवारने १६, मो. वसीमने २५, संदीप सहानीने ११ व सय्यद सादिकने १३ धावा जोडल्या. हायटेककडून ऋषिकेश नायर व मुसा पटेलने प्रत्येकी २ गडी बाद केले.

गुड्डूने एमआयटीला हरवलेे दुसऱ्या रोमांचक उपांत्य लढतीत एमआयटी संघाने गुड्डू संघावर एका धावेने विजय मिळवला. वैभव चाैगुलच्या (८७) अर्धशतकाच्या जोरावर एमअायटीने ९ बाद १९१ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात गुड्डू ईएमआय २१ संघ २० षटकांत ९ गडी गमावत १९० धावा करु शकला. खालेद कादरीने ५० चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचत ६५ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. शेख यासरने ३१ चेंडूंत ४७ धावा व समर्थ राजने १० चेंडूंत २३ धावांचे योगदान दिले.

बातम्या आणखी आहेत...