आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शिवरायांच्या जीवनावरील पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथालय असावे - उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आजपर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. या पुस्तकाचे स्वतंत्र ग्रंथालय उभे राहिले पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी व्यक्त केले. शहरातील बलवंत वाचनालय येथे शुभम साहित्यच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनास सामंत आणि रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली.

दरम्यान, शुभम साहित्यच्या वतीने कुणाल ओंबासे आणि करण ओंबासे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि नियोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, विभागीय सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे साहेब आणि बीडचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के साहेब उपस्थित होते.

प्रसंगी सामंत म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालय बंद आहेत. शैक्षणिक क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून होत आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून लवकरच शाळा महाविद्यालये सुरु होतील. विद्यार्थींना सक्षम करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. असे म्हणत संपूर्ण ग्रंथप्रदर्शन सामंत यांनी पाहिले.

बातम्या आणखी आहेत...