आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापापड, कुरडई आणि मुखवास हे भारतीय कुटुंबात पारंपरिक पद्धतीने बनवलेच जातात. मात्र, आधुनिक काळात माणसांचा पेहराव बदलतो तसेच खाद्यपदार्थांचे रुपडेही बदलले आहे. पूर्वी शिक्षण नाही पण कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी महिला घरगुती व्यवसाय करायच्या.आता उच्चशिक्षित महिला कुटुंब सांभाळून काही करावे म्हणून नव्या रूपात हे पदार्थ घेऊन आल्या आहेत. गुरुवारी शहागंज येथील हिराचंद कासलीवाल मैदानावर सुरू झालेल्या जैनम महिला मंचच्या प्रदर्शनात अशा नव्या उद्योजिकांनी यात सहभाग घेतला.
जैनमचे हे सातवे प्रदर्शन आहे. महिला उद्योजकांना व्यासपीठ देण्यासाठी आयोजित या प्रदर्शनात ७५ स्टाॅल्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुंबई, हैदराबाद येथूनही महिला उद्योजक यात सहभागी झाल्या आहेत.
घरातूनच पापड, लोणची, विविध पिठांची विक्री
एन- ६ येथील प्रिया जैन म्हणाल्या, कोविडनंतर आपण काहीतरी केले पाहिजे या विचाराने मी घरातूनच पापड, लोणची, विविध पीठांच्या इन्स्टंट रेसिपी बनवून विक्रीला सुरुवात केली. गेल्या सहा महिन्यांत मागणी वाढली. त्यामुळे आता प्रदर्शनात स्टॉल लावला आहे. ३५ हून अधिक पदार्थ माझ्याकडे आहेत. महिला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
नोकरीमुळे पदार्थ बनवण्यास मर्यादा
संगीता कासलीवाल म्हणाल्या, वाळूजला नोकरी करणाऱ्या अनेक महिला आहेत. धावपळीमुळे पापड, कुरडई, मसाले बनवणे त्यांना शक्य होत नाही. शिवाय हे पदार्थ विकत घेताना विश्वसनीयतेचा विषय असतो. मी स्वत: बनवत असलेले पदार्थ महिला पाहू शकतात.
युनिक, अँटिक वस्तूंना मागणी
अनिता अग्रवाल म्हणाल्या, युनिक आणि अँटिक वस्तूंना मागणी वाढली आहे. शिवाय यासाठी पैसे मोजण्याचीही तयारी असते. त्यामुळे मी फुलांचे वेगळे बुके बनवले. त्याला मागणी आल्याने आता प्रदर्शनात आणले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.