आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात पालिका तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा १ तारखेला अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने हिंगोलीत गुरुवारी ता. १ काळ्या फिती लाऊन आंदोलन करण्यात आले आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास आणखी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येथील पालिका कार्यालयासमोर संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे, अभियंता रत्नाकर अडसिरे, बाळू बांगर, डी. बी. ठाकुर, शाम माळवटकर, हिरेमठ, पुतळे, धुळे, प्रक्रिया कोकरे, सविता घनसावंत, चित्रा वर्मा, संदिप घुगे, विजय रामेश्वर, विजय शिखरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लाऊन घोषणाबाजी केली.
शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दहमहा १ तारखेला अनुदान द्यावे, कर्मचाऱ्यांचे वेतन कोषागार कार्यालयामार्फत करावे, अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करावी, जानेवारी २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीतील थकीत अनुदान त्वरीत द्यावे, अश्वासीत प्रगती योजना विनाअट लागू करावी, १९९३ पुर्वीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास ता. १५ एप्रील रोजी लेखनीबंद आंदोलन केले जाणार असून त्यानंतर ता. १ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी सांगितले. या आंदोलनात जिल्हयातील तीन नगर पालिका व दोन नगर पंचायतीचे कर्मचारी सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.