आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी क्लिंटन आजपासून दोन दिवस औरंगाबादमध्ये:उद्या वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिरास भेट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन मंगळवार, ७ फेब्रुवारीपासून दोन दिवस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मंगळवारी क्लिंटन या चार्टर विमानाने अहमदाबादहून दुपारी तीनच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर येतील. त्यानंतर ध्यान फार्म इथे त्या मुक्कामाला असणार आहेत. तसेच बुधवार, ८ फेब्रुवारीला त्या वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरालाही भेट देणार आहेत.

गुरुवार, ९ फेब्रुवारीला त्या औरंगाबादहून दुपारी १२ वाजता वाराणसीला रवाना होणार आहेत. हिलरी क्लिंटन यांनी गेल्या दोन दिवसांत गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यात त्यांनी भेटी दिल्या आहेत. अहमदाबादमध्ये त्यांनी सेल्फ एम्पाॅवर्ड वुमन असोसिएशनच्या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली. दरम्यान, औरंगाबाद दौऱ्याबाबत फारशी माहिती जिल्हा प्रशासनालाही सांगण्यात आलेली नाही,असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...