आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या योजना दबावापोटीच:शेतकऱ्यांच्या विकासासाठी तेलंगणा मॉडेल वापरण्याचे हिमांशू त्रिवेदींचे राज्य सरकारला आवाहन

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली सहा हजार रुपये मदतीची घोषणा ही केवळ भारत राष्ट्रीय समितीच्या दबावापोटीच केली आहे. बी आर एस शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा स्वागत करते.मात्र राज्य सरकारने शेतकऱ्याच्या विकासासाठी तेलंगणा मॉडेल अवलंबविले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल तसेच बाभळीचा प्रश्न सोडवण्यास तेलंगणा सरकार उत्सुक असून राज्य सरकारने प्रतिसाद द्यावा असे आवाहन बी आर एस स चे सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी यांनी केले आहे.

भारत राष्ट्रीय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद विभागाचे समन्वयक सोमनाथ थोरात भारत राष्ट्रीय समितीचे महाराष्ट्राचे किसान सेल अध्यक्ष माणिक कदम यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

वीज पाणी मोफत द्या

यावेळी बी आर एस चे सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी म्हणाली की तेलंगणा सरकार तेलंगणा मधल्या शेतकऱ्यांना वीज पाणी मोफत देते. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपये अनुदान देते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील याच पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केल्यास त्यांना फायदा होईल. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना वीज पाणी मोफत दिले जाते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देखील पाणी मोफत देण्याची मागणी त्रिवेदी यांनी केली आहे.

बाभळीबाबत पुढाकार घ्यावा

बाभळी प्रकरणात महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचे याबाबत विचारले असता बाभळी प्रकरणात तेलंगणा सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे.मात्र या प्रकरणात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाला सर्वत्र पाणीपुरवुन सुजलाम सुफलाम केले आहे.त्यामुळे बाभळीचा प्रश्न देखील सहज सुटेल. त्यासाठी कुठलेही राजकारण करू नये अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.

बातम्या आणखी आहेत...