आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरण संवर्धन आणि शहर नियोजन या क्षेत्रात कार्यरत शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी रविवारी सकाळी हिमायतबागेत जमले होते. या वेळी नेमका प्रश्न काय आहे, कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव काय आहे, जैवविविधता समितीपुढे मांडण्यात आलेला मूळ प्रस्ताव काय होता, घूमजाव कसे करण्यात आले आहे, न्यायालयाचे निर्देश काय आहेत यावर चर्चा व पुढील कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. तीनशे एकरांवरील जैवविविधतेसह हिमायतबाग वाचवणे हे आपले कर्तव्य असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्याचा सहभागी संघटना व नागरिकांनी निर्णय घेतला.
या संस्था बैठकीत होत्या सहभागी {अम्ब्रेला वेल्फेअर फाउंडेशनचे सदस्य {प्रयास यूथ फाउंडेशनचे रवी चौधरी {औरंगाबाद प्लॉगर्सचे संस्थेचे प्रतिनिधी {इस्लामिक रिसर्च सेंटरचे सदस्य {डॉ. किशोर पाठक {वी संस्थेचे सदस्य.
केंद्र सरकारकडे दाद मागणार हिमायतबाग वाचवण्याच्या अभियानास चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच याबाबत केंद्र सरकारचे पर्यावरण मंत्रालय, राष्ट्रीय जैवविविधता समिती यांना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याचे निवेदन देण्याचे ठरवण्यात आले. शहरवासीयांमध्ये जनजागृती करणे आणि हिमायतबाग वाचवण्यासाठी राज्यभरातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. आपल्या शहराचे आरोग्य, पर्यावरण जपण्यासाठी यात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. - अॅड. संतोष हांगे, याचिकाकर्ते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.